Anuradha Vipat
ओठ कोरडे पडल्यामुळे किंवा भेगाळल्यामुळे लिपस्टिक लावल्यावर ती खराब दिसते.
क्रॅक-फ्री आणि स्मूथ लिपस्टिक लूक मिळवण्यासाठी तुम्ही खालील स्टेप्स फॉलो करा.
लिपस्टिक लावण्यापूर्वी ओठांवरील मृत त्वचा काढणे सर्वात महत्त्वाचे आहे.
साखर आणि मध एकत्र करून ओठांवर हलक्या हाताने चोळा. यामुळे ओठ मऊ होतात आणि लिपस्टिक क्रॅक होत नाही.
लिपस्टिक लावण्यापूर्वी किमान १० मिनिटे आधी उत्तम प्रतीचा लिप बाम लावा.
लिपस्टिक थेट लावण्याऐवजी आधी लिप लायनरने ओठांना आकार द्या यामुळे लिपस्टिक ओठांच्या भेगांमध्ये साचत नाही आणि दीर्घकाळ टिकते.
जर तुमचे ओठ काळे असतील, तर लिपस्टिक लावण्यापूर्वी थोडे फाऊंडेशन किंवा कन्सीलर लावा.