Anuradha Vipat
खेकडा चवीसोबतच आरोग्यासाठीही अत्यंत फायदेशीर आहे.मात्र तो खाताना काही पथ्ये पाळणे आवश्यक आहे.
खेकड्यामध्ये उच्च दर्जाचे प्रोटीन असते, जे स्नायूंच्या बांधणीसाठी आणि शरीराच्या दुरुस्तीसाठी आवश्यक आहे.
खेकड्यामध्ये फॉस्फरस आणि कॅल्शियम असते, जे हाडे आणि दात मजबूत ठेवण्यास मदत करतात.
खेकडा खाल्ल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो आणि मेंदूची कार्यक्षमता वाढते.
अनेक लोकांना 'शेलफिश'ची ऍलर्जी असते. अशा व्यक्तींना खेकडा खाल्ल्याने अंगावर पित्त उठणे, सूज येणे असा त्रास होऊ शकतो.
ज्यांना हृदयविकार किंवा उच्च कोलेस्ट्रॉलचा त्रास आहे, त्यांनी मर्यादित प्रमाणातच याचे सेवन करावे.
ज्यांना यूरिक ॲसिड किंवा गाउट यांसारख्या सांधेदुखीच्या समस्या आहेत, त्यांनी खेकडा खाणे टाळावे.