Anuradha Vipat
गाईचे शुद्ध तूप हे कोरड्या त्वचेसाठी एखाद्या नैसर्गिक अमृतासारखे काम करते.
आयुर्वेदात तुपाला उत्तम 'स्नेहन' मानले गेले आहे, जे त्वचेच्या खोल थरांपर्यंत जाऊन पोषण देते.
हिवाळ्यात किंवा हवामानातील बदलामुळे त्वचा कोरडी, निर्जीव आणि निस्तेज झाल्यास गाईचे तूप अत्यंत प्रभावी ठरते.
तुपात व्हिटॅमिन ए, डी, आणि ई सोबतच शक्तिशाली अँटी-ऑक्सिडंट्स असतात. हे घटक त्वचेवरील सुरकुत्या कमी करतात, कोरडेपणामुळे आलेली खाज थांबवतात.
कोरड्या हवेमुळे ओठ फाटणे किंवा हाता-पायांच्या टाचांना भेगा पडणे यावर गाईचे तूप लावल्यास त्वचा वेगाने बरी होते.
रात्री झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुवा. हातावर गाईच्या तुपाचे फक्त २ ते ३ थेंब घ्या आणि हातावर घासून ते थोडे कोमट करा. यानंतर चेहऱ्यावर हलक्या हाताने गोलाकार मसाज करा.
१ चमचा गाईचे तूप आणि १ चमचा शुद्ध मध एकत्र करून चेहऱ्यावर लावा. २० मिनिटांनी चेहरा धुवून घ्या. यामुळे कोरडी त्वचा लगेच हायड्रेट होते.