Swapnil Shinde
दिवसेंदिवस टेरेस गार्डन म्हणजेच रूफटॉप फार्मिंगची क्रेझ वाढत आहे.
टेरेस गार्डनमध्ये फुल झाडांसह भाजीपाल्याचेही उत्पादन घेता येते.
बहुतेक लोक टेरेस गार्डनमध्ये रोज लागणाऱ्या टोमॅटो पिकवण्यास प्राधान्य देत आहेत.
त्याचबरोबर वांगी, पालक, कोथिंबीर, टोमॅटो, भेंडी, मिरची यांसारख्या भाज्या ५ ते ७ इंचाच्या कुंडीत पिकवता येतात.
भेंडी लागवड करण्यासाठी भिजवलेल्या भेंडीच्या बिया 50 टक्के माती, 20 टक्के कोको पीट, 30 टक्के शेणखत असलेल्या कुंडीत ठेवा
या कुंडीमध्ये भेंडीच्या बिया टाका आणि मातीने झाकून टाका.
रोपला चांगली माती आणि खत दिल्यानंतर सुमारे ४७ दिवसानंतर भेंडी येण्यास सुरुवात होते.