Aslam Abdul Shanedivan
मागील वर्षापासून कपाशीच्या दर घसरणीला झालेली सुरुवात थांबलेली नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे.
सध्या अवघा सहा हजारांपासून साडेसात हजारांदरम्यान दर आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांनी कापूस साठवून ठेवला आहे.
दराच्या अपेक्षेने कापूस किती दिवस ठेवावा व कधी विकावा, अशी द्विधा मनःस्थिती शेतकऱ्यांची झाली असून बाजारात आवकही वाढलेली आहे.
यंदा असमतोल पावसामुळे कापूस उत्पादनाला फटका बसलेला आहे. हजारो क्विंटल कापूस पावसाने भिजल्याने कापसाचा दर्जाही खालावला आहे.
चांगल्या दर्जाचा कापूसलाही जेमतेम दर्जाच्या कापसाप्रमाणेच साडेसहा ते साडेसात हजारांदरम्यान दर मिळत आहे.
मागील तीन वर्षांतील दरांची स्थिती पाहिली तर मागील वर्षात डिसेंबर जानेवारीत ८००० ते ८२०० पर्यंत दर मिळत होते. त्याच्याआधी १० ते १२ हजारांपर्यंत दर होता. मात्र फक्त दोन वर्षांत तो ५ हजारांनी घसरला आहे.
वर्ष---सरासरी भाव
२०२२---१० हजारांपर्यंत
२०२३---८२०० ते ८३०० रुपये
२०२४---६५०० ते ७५००