Aslam Abdul Shanedivan
राज्यातील ९ लाख ऊसतोडणी कामगारांना किती मजुरी वाढ द्यायची यावरून तिढा निर्माण झाला होता.
माजी केंद्रीय मंत्री शरद पवार आणि यांनी भाजप नेत्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी तोडगा काढला
मजुरीदरात आता ३४ टक्के वाढ झाली असून, त्यामुळे अंदाजे ११०० कोटी रुपये तोडणी मजुरांच्या जादा मिळणार आहे.
राज्यातील ऊस तोडणी कामगारांना आधी २७ टक्के वाढ देण्यास साखर संघ तयार होता. मात्र तोडणी कामगार संघटनांना किमान ४० टक्के वाढवर आढून बसल्या होत्या.
त्यानंतर यावर तोडगा काढण्यासाठी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार आणि यांनी भाजप नेत्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्यात पुण्यात बैठक झाली होती. त्यात हा तोडगा निघाला.
१) ऊसतोडणी कामगारांच्या मजुरीत ३४ टक्के वाढ.
२) कर्नाटक, गुजरात, तमिळनाडूत ऊसतोडीस गेलेल्या कामगारांनाही करार लागू
३) मुकादम कमिशन दरात एक टक्का वाढ.
४) मजुरी दरवाढीचा करार तीन हंगामासाठी लागू राहील.
५) अॅडव्हान्स पद्धतीत फसवणूक थांबविण्यासाठी कायदा.
६) ऊस तोडणी कामगार कल्याणकारी महामंडळातील उपक्रमांना वेग देणे.
७) तोडणी कामगारांना ओळखपत्र व इतर सुविधा मिळणार.