Swarali Pawar
हा रोग एक्सेरोहिलम टर्सिकल या बुरशीमुळे होतो. थंड आणि जास्त आर्द्रतेच्या वातावरणात याचा प्रसार वेगाने होतो.
पानांवर लांब अंडाकृती, करड्या-हिरव्या रंगाच्या चिरा दिसतात. कालांतराने पाने वाळून गळतात आणि कधी कणीस व खोडातही रोग पसरतो.
रोगप्रतिकार वाणांची निवड व रोगग्रस्त पालापाचोळा नष्ट करावा. तण काढून शेणखत व कंपोस्टचा वापर केल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते.
मॅन्कोझेब किंवा झायनेब २.५ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारावे. कार्बेन्डेझीम + मॅन्कोझेब किंवा अॅझाक्झिस्ट्रोबीन + डायफेनकोनॅक्झोल यांचेही फवारणीसाठी उपयोग होतो.
हा रोग ड्रेस्क्लेरा मेडिस या बुरशीमुळे होतो. उष्ण दमट किंवा थंड हवामान या रोगाला अनुकूल असते.
पानांच्या शिरांमध्ये तपकिरी किंवा लालसर तपकिरी चिरा दिसतात. गंभीर अवस्थेत पाने वाळून संपूर्ण झाड कोमेजते.
पिकाची फेरपालट करावी आणि रोगप्रतिकारक्षम वाणांची लागवड करावी. रोगग्रस्त अवशेष पूर्णपणे नष्ट करावेत.
मॅन्कोझेब, कार्बेन्डेझीम + मॅन्कोझेब किंवा अॅझाक्झिस्ट्रोबीन + डायफेनकोनॅक्झोलची फवारणी प्रभावी ठरते. योग्य प्रमाणात औषध मिसळून फवारणी करणे महत्त्वाचे आहे.