Anuradha Vipat
कोथिंबीर आणि पुदीन्याची चटपटीत चटणी ही एक लोकप्रिय आणि चविष्ट साईड डिश आहे
कोथिंबीर आणि पुदीन्याची चटपटीत चटणी जेवणाची चव वाढवते. सँडविच, भजी किंवा स्नॅक्ससोबत ही चटणी खूप छान लागते.
कोथिंबीर, पुदीना पाने , २-३ हिरव्या मिरच्या , आले , लसूण पाकळ्या, जिरे, लिंबाचा रस, मीठ, पाणी, साखर .
मिक्सरच्या भांड्यात धुतलेली कोथिंबीर, पुदीना पाने, हिरव्या मिरच्या, आले, लसूण पाकळ्या , जिरे आणि मीठ थोडे पाणी घालून बारीक करून घ्या.
चटणी बारीक झाल्यावर त्यात लिंबाचा रस आणि साखर घाला.
चटणी एका हवाबंद डब्यात किंवा वाटीत काढून घ्या. फ्रिजमध्ये ठेवल्यास ३ ते ४ दिवस ताजी राहते.
चटणीला आणखी चटपटीत बनवण्यासाठी त्यात शेंगदाणे घालू शकता.