Anuradha Vipat
कोथिंबीर ही केवळ जेवणाची चव आणि सुगंध वाढवणारी वनस्पती नसून, ती औषधी गुणांचा मोठा खजिना आहे.
कोथिंबिर शरीरातील वात, पित्त आणि कफ संतुलित ठेवण्यास मदत करते, वाढलेले पित्त शांत करण्यासाठी कोथिंबीर अत्यंत फायदेशीर आहे.
कोथिंबीर पाचक अग्नी प्रज्वलित करते, ज्यामुळे खाल्लेले अन्न सहज पचते.
शरीरात अतिउष्णता वाढल्याने हातापायांची आग होत असल्यास कोथिंबीर आराम देते.
कोथिंबिरीमध्ये मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन 'ए' असते, जे डोळ्यांची दृष्टी तेज राखण्यास मदत करते.
कोथिंबीर रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते.
ही भाजी शरीरातील वाईट कोलेस्टेरॉल कमी करून चांगल्या कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढवते.