Anuradha Vipat
तांब्याच्या भांड्यातील पाणी आरोग्यदायी मानले जात असले तरी काही विशिष्ट आजार असलेल्या लोकांसाठी ते धोकादायक आहे.
हा एक दुर्मिळ अनुवांशिक आजार आहे, ज्यामध्ये यकृत आणि मेंदूमध्ये तांबे जमा होऊन अवयव निकामी होण्याचा धोका असतो.
ज्यांना किडनी किंवा यकृताशी संबंधित गंभीर समस्या आहेत त्यांनी हे पाणी पिऊ नये.
ज्यांना सतत ऍसिडिटी , गॅस, पोटात जळजळ किंवा छातीत जळजळ होण्याचा त्रास होतो, त्यांनी तांब्याचे पाणी टाळावे.
जुलाब, उलट्या किंवा वारंवार मळमळ होत असल्यास तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्याने त्रास वाढू शकतो .
हृदयाशी संबंधित गंभीर आजार असलेल्या रुग्णांनी हे पाणी पिण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे अनिवार्य आहे
शरीरातील तांब्याचे संतुलन बिघडू नये म्हणून गर्भवती महिलांनी आणि बाळाला दूध पाजणाऱ्या मातांनी हे पाणी पिणे टाळावे.