Mahesh Gaikwad
कर्नाटकच्या पश्चिम घाटात वसलेले कुर्ग एक अप्रतिम हिल स्टेशन आहे. येथील निसर्ग संपन्नतेमुळे याला भारताचे स्कॉटलंड असेही म्हटले जाते.
येथील निसर्ग म्हणजे नजर जाईल तिथवर हिरवे डोंगर, धुक्याची चादर आणि शांत वातावरण. कुर्ग हे नैसर्गिक सौंदर्याची खाणच आहे.
कुर्ग हा भारतातील प्रमुख कॉफी उत्पादन करणारा प्रदेश आहे. कॉफीचे अरेबिका आणि रोबस्टा प्रकार जगभर प्रसिद्ध आहेत.
याशिवाय येथे नमद्रोलिंग टिबेटीयन मठ आणि ओमकारेश्वर मंदिर ही प्रमुख पर्यटकांना आकर्षित करणारे ठिकाणे आहेत. येथे शांतता आणि संस्कृतींचं दर्शन होते.
येथील दुबारे एलिफंट कॅम्पमध्ये तुम्ही हत्तींच्या जवळ जाऊ शकता, त्यांना अंघोळ घालू शकता.
कुर्गमध्ये तुम्ही साहसी खेळांचा आनंदही घेवू शकता. येथे ट्रेकिंग, व्हाइट वॉटर राफ्टिंग, जंगल सफारी अशा अनेक साहसी ट्रेकचा अनुभव घेवू शकता.
पर्यटनासाठी कुर्गमध्ये ऑक्टोबर ते मार्च ही कालावधीत सर्वोत्तम आहे. जर तुम्हीही या उन्हाळ्यात फिरायला जाण्याचे प्लॅनिंग करत असाल, तर कुर्ग तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे.