Anuradha Vipat
हिरव्या रंगाची साडी ही सदाबहार असते, पण त्यावर योग्य रंगाचे ब्लाऊज निवडले तर तुमचा लूक अधिक खुलून दिसतो.
हा एक पारंपारिक आणि सर्वात लोकप्रिय 'कॉन्ट्रास्ट' प्रकार आहे.
गडद हिरव्या साडीवर राणी कलरचे ब्लाऊज खूप आकर्षक दिसते.
जर साडीला सोनेरी काठ असतील, तर गोल्डन ब्लाऊज हा एक रॉयल पर्याय आहे.
मॉडर्न आणि स्टायलिश लूक हवा असेल, तर प्लेन हिरव्या साडीवर काळ्या रंगाचे डिझाइनर ब्लाऊज नक्की ट्राय करा.
हळदीच्या कार्यक्रमासाठी किंवा दिवसाच्या फंक्शनसाठी हिरव्या साडीवर पिवळ्या रंगाचे ब्लाऊज अतिशय छान दिसतात.
जर साडी काठापदराची असेल, तर ब्रोकेड वर्क असलेले ब्लाऊज साडीला रिच लूक देतात.