Black Pepper : मसाल्यातील तिखट काळे मिरे आरोग्यासाठी गोड

sandeep Shirguppe

काळे मिरे

मिरे हे जगातील सर्वांत जुने व फार महत्त्वाचे मसाल्याचे पीक आहे. चरकसंहिता, बृहत्संहिता व तमिळ वाङ्‌मयात त्याचे पुष्कळ उल्लेख आढळतात.

Black Pepper | agrowon

औषधी गुणधर्म

काळे मिऱ्यात खूप औषधी गुणधर्म आहेत. त्यामुळे याचा आरोग्यासाठी खूप उपयोग होतो. भारतात मिरवेलीचे 75 पेक्षा अधिक प्रकार लागवडीत आहेत.

Black Pepper | agrowon

विविध प्रकार

केरळात कल्लुवल्ली, बालनकोट्टा, करिमुंडा आणि कोट्टानड हे जुन्या प्रकारांपैकी जास्त उत्पन्न देणारे प्रकार आहेत.

Black Pepper | agrowon

डेंग्यू तापाला उपयुक्त

डेंग्यू तापाला कारणीभूत ठरणाऱ्या डासावर काळ्या मिरीचा मारक परिणाम होतो.

Black Pepper | agrowon

पित्तविरोधी

डासांची अंडी मिरीमुळे नष्ट होण्यास मदत होते. काळे मिरेची पावडर कर्करोग आणि पित्तविरोधी आहे.

Black Pepper | agrowon

भगभग दूर

पित्तामुळे पोटात गुडगुड किंवा भगभग होत असल्यास मिरे खाल्ल्याने थांबते. मिऱ्याची पावडर पाण्याबरोबर घेतल्यास भूकही वाढते.

Black Pepper | agrowon

पायपॅरीन घटक

काळया मिरीमध्ये पायपॅरीन नावाचा घटक असतो. आणि पायपॅरीनमध्ये अॅन्टीऑक्सिडंट गुणधर्म आहेत.

Black Pepper | agrowon

भुकटी फायद्याची

काळे मिरे आणि वेलदोडा (विलायची) समप्रमाणात घेऊन भुकटी करुन ती घेतल्यावर लूज मोशन थांबण्यास मदत होते.

Black Pepper | agrowon

पोटातील जंतुचा नायनाट

पायपॅरीन हे शरीरातल्या काही कर्करोगांना कारणीभूत ठरणाऱ्या जंतूंचा नायनाट करु शकते. तसेच पायपॅरीन हे जनावरांनासुद्धा उपयुक्त असल्याचे दिसून आले आहे.

Black Pepper | agrowon