sandeep Shirguppe
सध्या सकस आहार कमी करून अनेकजण फास्ट फूड आणि स्नॅक्स खाण्याचे प्रमाण तरूणाईत वाढलं आहे.
जास्त प्रमाणत स्नॅक्स खाल्ल्याने आरोग्याला नुकसान होऊ शकते. याचा सर्वाधिक तोटा पचनसंस्थेवर होतो.
बाजारात अनेक प्रकारचे स्नॅक्स उपलब्ध आहेत .काही तोंडाची चव वाढवतात तर काही शरीराला ऊर्जा देतात.
कोणतेही स्नॅक्स खाणे आरोग्यास हणीकारक असतं. स्नॅक्स हा कॅलरीयुक्त असतो. यामुळे वजन मोठ्या प्रमाणात वाढते.
स्नॅक्स चटपटीत बनवण्यासाठी त्यामध्ये अनेक पदार्थ टाकले जातात. यामुळे शरीराला संसर्ग होण्याचा धोका वाढतो
सतत स्नॅक्स खाल्ल्यास शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढते. परिणामी हृदयासंबंधित आजार बळावतात.
जास्त प्रमाणात स्नॅक्स खाल्ल्यास शरीरातील साखरेचे प्रमाण वाढते. परिणामी मधुमेहाची समस्या उद्भवते.
तुम्हाला स्नॅक्सची भूक लागल्यास सुकामेवा आणि फळांचा आस्वाद घ्या. यामुळे शरीराला ऊर्जा मिळेल.
ही माहिती फक्त तुमच्या ज्ञानात भर पाडण्याचा उद्देश आहे. अधिक तपशीलासाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.