Aslam Abdul Shanedivan
राज्यासह देशात कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत असते. त्यामुळे अनेकदा कांद्याचा दर घसरतो
अशावेळी राज्यात कांदा उत्पादक शेतकरी कांदा दर वाढीवर लक्ष ठेवताना कांदा चाळीत ठेवतात
मात्र अनेक कारणांमुळे कांद्याची नासाडी होते. ही होणारी कांद्याची नासाडी रोखण्यासाठी आणि साठवणुकीसाठी राज्यातील सरकारने मोठी योजना आखली आहे.
राज्य सरकारने यासाठी अणुऊर्जा आधारित कांदा महाबँक प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
तर राज्यातील पहिला कांदा महाबँक प्रकल्प नाशिक, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर येथे तातडीने सुरू करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.
कांदा नाशवंत पीक असल्याने अणुऊर्जेच्या माध्यमातून विकिरण प्रक्रिया करून कांद्याची साठवणूक करता येणार आहे.
तर कांद्याची महाबँक संकल्पनेतून अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी हिंदुस्थान अॅग्रो इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून कांद्याची बँक सुरू होणार आहे.