sandeep Shirguppe
प्रत्येकाच्या शरिराला झोपेची गरज असतं. प्रत्येक व्यक्तीने दर दिवसाला ७-८ तासांची झोप घ्यायची असते.
मात्र आपल्यापैकी काही जण जास्त प्रमाणात झोपतात, गरजेपेक्षा जास्त झोपत असाल तर ते तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते.
सकाळी उठल्यानंतर किंवा सतत झोप येत असेल तर हे शरीरातील काही व्हिटॅमिनच्या कमतरतेचं लक्षण असू शकतं.
व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे झोपेशी संबंधित समस्या उद्भवतात. या व्हिटॅमीनच्या कमतरतेमुळे व्यक्तीला जास्त झोप येण्याची शक्यता असते.
व्हिटॅमिन बी १२ आपल्या नर्वस सिस्टमसाठी आणि लाल पेशींच्या निर्मितीसाठी खूप महत्वाचं मानलं जातं.
याशिवाय व्हिटॅमिन बी१२ च्या कमतरतेमुळे अशक्तपणा, हृदयाचे ठोके वाढणं या समस्या दिसून येतात.
व्हिटॅमिन सी केवळ आपल्या रोगप्रतिकारक शक्तीसाठीच नाही तर शरीरातील ऊर्जेची पातळी योग्य राखण्यासाठी देखील खूप महत्वाचं आहे.