Anuradha Vipat
अंगाला सतत खाज सुटणे ही एक अत्यंत त्रासदायक समस्या आहे.
हिवाळ्यातील कोरडी हवा, त्वचेचा कोरडेपणा, ॲलर्जी, घाम किंवा रक्तातील अशुद्धता ही याची मुख्य कारणे असू शकतात.
खोबरेल तेल त्वचेला खोलवर मॉइश्चराईज करते आणि कापूर खाज व जळजळ शांत करतो.
कडुलिंबामध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-फंगल गुणधर्म असतात, जे कोणत्याही संसर्गामुळे होणारी खाज नष्ट करतात.
कोरफड हे त्वचेसाठी वरदान मानले जाते, जे खाज आणि सूज कमी करण्यास मदत करते.
त्वचेची ॲलर्जी किंवा पुरळ यामुळे खाज सुटत असल्यास हा उपाय प्रभावी ठरतो.
वैद्यकीयदृष्ट्या ओट्स हे त्वचेची जळजळ आणि खाज थांबवण्यासाठी अत्यंत गुणकारी मानले जातात.