Anuradha Vipat
श्रावण सोमवारच्या उपवासाला सात्विक आहार घेणे आणि तामसी पदार्थांचे पूर्णपणे त्याग करणे हा सर्वात मुख्य नियम आहे.
महादेवाची कृपा मिळवण्यासाठी केवळ उपाशी राहणे महत्त्वाचे नाही, तर शरीराची आणि मनाची शुद्धता राखणे गरजेचे आहे.
सफरचंद, केळी, डाळिंब, चिकू यांसारखी ताजी फळे आणि काजू, बदाम, मनुके, खजूर खावेत. दूध, दही, ताक, पनीर आणि घरचे शुद्ध तूप यांचा आहारात वापर करावा.
साबुदाणा , वरीचा भात , राजगिरा आणि शिंगाड्याचे पीठ खावे. रताळे आणि बटाटे उकडून किंवा त्यांची भाजी करून खाऊ शकता.
शहाळ्याचे पाणी, लिंबू पाणी आणि ताजी फळांचे ज्यूस प्यावेत, ज्यामुळे शरीर हायड्रेट राहते.
गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, हरभरा डाळ, मटकी किंवा इतर कोणतेही कडधान्य खाऊ नये. श्रावण महिन्यात स्वयंपाकात कांदा आणि लसणाचा वापर अजिबात करू नये.
साधे मीठ, हळद, मोहरी, हींग आणि गरम मसाला उपवासाच्या पदार्थात घालू नये. बाजारात मिळणारे वेफर्स किंवा नमकीन खाणे टाळावे. मांसाहार, अंडी, दारू, तंबाखू आणि सिगारेटचे सेवन चुकूनही करू नये.