World Agri-Tourism Day : कृषी पर्यटनातून पूरक व्यवसायाची संधी

Team Agrowon

कृषी पर्यटन हे सामान्य पर्यटनाच्या तुलनेमध्ये थोडी नावीन्यपूर्ण संकल्पना आहे. हा शेतीपूरक असा व्यवसाय असून, सामान्य हॉटेलिंग किंवा मनोरंजन पार्कच्या तुलनेमध्ये त्यांचे वेगळेपण लक्षात घेतले पाहिजे.

World Agri-Tourism Day | Agrowon

उत्तम शेती पाहणे आणि शेती कामांचा अनुभव, ग्रामीण व नैसर्गिक वातावरण, पाळिव जनावरांशी संबंधित काही कामे यांचा अनुभव लोकांना घेता येतो.

World Agri-Tourism Day | Agrowon

स्थानिक व वैशिष्ट्यपूर्ण खाद्यपदार्थांचा स्वाद घेता येतो. शेतातून ताजी उत्पादने थेट खरेदी करण्याची संधी मिळते.

World Agri-Tourism Day | Agrowon

ग्रामीण लोकांचे दैनंदिन जीवन, तसेच सांस्कृतिक घटक आणि परंपरा यांची माहिती मिळते. यातून ग्रामीण आणि शहरी बागांमध्ये समन्वय निर्माण होऊ शकतो.

World Agri-Tourism Day | Agrowon

शेतकऱ्यांना यातून अतिरिक्त उत्पन्नासोबत विविध उत्पादनांना कायमस्वरूपी ग्राहक मिळू शकतात. कुटुंबातील सदस्यांना रोजगाराची संधी मिळते.

World Agri-Tourism Day | Agrowon

कमीत कमी दोन हेक्टर जमीन, उत्तम शेतघर, पाण्याची उत्तम सोय, एखादा जलस्रोत आणि पर्यटकांना विविध सेवा व मनोरंजन देण्याची इच्छा, थोडा बोलका स्वभाव इतक्या भांडवलावर कोणताही शेतकरी कृषी पर्यटन केंद्र सुरू करू शकतो.

World Agri-Tourism Day | Agrowon

वैयक्तिक शेतकरी व्यतिरिक्त कृषी सहकारी संस्था, अशासकीय संस्था, कृषी विद्यापीठे आणि कृषी महाविद्यालये येथील अशी केंद्रे सुरू करता येतात. काही वैशिष्ट्यपूर्ण ग्रामपंचायतींही शेतकऱ्यांच्या मदतीने अशी केंद्रे सुरू करू शकतात.

World Agri-Tourism Day | Agrowon