Anuradha Vipat
आत्ताच्या आधुनिक काळात प्रत्येक विवाहित महिलेला खालील गोष्टी माहिती असणे आवश्यक आहे.
तुमचे स्वतःचे स्वतंत्र बँक खाते असणे आवश्यक आहे. पतीच्या विम्याचे , गुंतवणुकीचे आणि नॉमिनेशनचे तपशील तुम्हाला माहित असावेत.
वयाच्या ३०-३५ नंतर थायरॉईड, हिमोग्लोबिन, व्हिटॅमिन डी-१२ आणि बोन डेंसिटीच्या चाचण्या नियमित करा. घराची जबाबदारी पेलताना स्वतःच्या आवडीनिवडी जपा.
कोणत्याही प्रकारचा शारीरिक किंवा मानसिक छळ सहन करू नका. पतीच्या संपत्तीत आणि वडिलांच्या वारसाहक्कात महिलांना समान अधिकार आहेत.
सर्व कामे स्वतःच करण्याची जिद्द धरण्यापेक्षा घरातील सदस्यांची मदत घ्या. नवीन कौशल्य शिका किंवा छंद जोपासा.
नात्यात आदर असणे महत्त्वाचे आहे. स्वतःच्या आत्मसन्मानाशी तडजोड करू नका.
'स्त्रीधन' म्हणजे लग्नात मिळालेले दागिने किंवा भेटवस्तू यावर केवळ तुमचा हक्क असतो .