Anuradha Vipat
नॉन-व्हेज बनवताना चव बिघडू नये आणि आरोग्य जपले जावे यासाठी खालील चुका टाळणे खूप महत्त्वाचे आहे.
फ्रिजमधील थंड मांस थेट गॅसवर ठेवू नका. यामुळे ते बाहेरून शिजते पण आतून कच्चे किंवा कडक राहते.
अनेकजण नळाखाली जोरात मांस धुतात, ज्यामुळे त्यातील बॅक्टेरिया स्वयंपाकघरात सगळीकडे उडतात.
चिकन किंवा मटणला दही, आले-लसूण पेस्ट आणि मसाल्यात किमान १-२ तास मॅरिनेट न केल्यास ते चवीला बेचव लागते.
मासे आणि चिकन जास्त शिजवल्याने ते चामड्यासारखे आणि कोरडे होतात. योग्य वेळ आणि आचेवर लक्ष ठेवा.
फोडणी देताना गॅस मोठा असेल तर मसाले जळतात आणि भाजीला कडवट चव येते. नेहमी मंद आचेवर मसाले परता.
रस्सा बनवताना नेहमी कोमट किंवा गरम पाण्याचा वापर करा. थंड पाणी टाकल्याने शिजण्याची प्रक्रिया थांबते आणि चव बदलते.