Anuradha Vipat
स्वयंपाक करताना घाईघाईत किंवा सवयीमुळे आपण किचनमध्ये अशा काही चुका करतो ज्याचा परिणाम अन्नाच्या चवीवर आणि आपल्या आरोग्यावर होतो.
अनेकदा घाईत आपण ओल्या हाताने मसाल्यांच्या डब्यातून मसाला काढतो. यामुळे मसाल्यांना बुरशी लागू शकते .
नॉन-स्टिक भांड्यांवर स्टीलचा चमचा वापरल्याने त्यावरील 'टेफ्लॉन' कोटिंग निघून जाते. हे कोटिंग अन्नासोबत पोटात गेल्याने आरोग्यास गंभीर धोका निर्माण होऊ शकतो.
गरम अन्न थेट फ्रीजमध्ये ठेवल्याने फ्रीजमधील तापमान वाढते, ज्यामुळे इतर पदार्थ खराब होऊ शकतात
अनेकजण भाज्या चिरल्यानंतर धुतात. यामुळे भाज्यांमधील महत्त्वाची जीवनसत्त्वे आणि खनिजे पाण्यासोबत वाहून जातात.
तेल प्रमाणाबाहेर तापल्याने त्यातील पोषक तत्वे नष्ट होतात आणि त्यात हानिकारक 'फ्री रॅडिकल्स' तयार होतात.
गरम पदार्थ प्लास्टिकच्या संपर्कात आले की प्लास्टिकमधील रसायने अन्नात मिसळतात.