Anuradha Vipat
सर्दी, फ्लू, आणि मोनोन्यूक्लिओसिस सारखे व्हायरल इन्फेक्शन घसा खवखवण्याचं सर्वात सामान्य कारण आहे.
स्ट्रेप थ्रोट सारखे बॅक्टेरियाचे संक्रमण घसा खवखवण्याचं कारण असू शकतं.
काही लोकांना विशिष्ट पदार्थांची ऍलर्जी असते, ज्यामुळे घसा खवखवतो.
ऍसिड रिफ्लक्स म्हणजे पोटामधील ऍसिड अन्ननलिकेत परत येणे. यामुळे घसा खवखवू शकतो.
कोरड्या हवेमुळे किंवा जास्त बोलल्यामुळे घसा कोरडा होऊ शकतो आणि त्यामुळे घसा खवखवतो.
तंबाखू आणि अल्कोहोलच्या अतिसेवनाने घसा कोरडा होतो आणि त्यामुळे घसा खवखवतो.
घशाचा कर्करोग देखील घसा खवखवण्याचं कारण असू शकतं.