Anuradha Vipat
तिरंग्याचे रंग आणि अशोकचक्र हे भारताच्या इतिहासाचे, संस्कृतीचे आणि त्यागाचे प्रतीक आहेत.
भारतीय तिरंग्यातील वरचा रंग म्हणजेचं केशरी रंग हा धैर्य आणि त्यागाचे प्रतीक आहे.
भारतीय तिरंग्यातील मधला रंग म्हणजेचं पांढरा रंग शांतता आणि सत्यतेचे प्रतीक आहे
भारतीय तिरंग्यातील खालचा आणि शेवटचा रंग म्हणजेचं हिरवा रंग समृद्धी आणि सुपीकतेचे प्रतीक आहे.
भारतीय तिरंग्यात मधोमध असलेले अशोकचक्र ज्याला २४ आरे आहेत ते प्रगती आणि निरंतरतेचे प्रतीक आहे.
भारतीय तिरंगा देशाच्या एकतेची आणि अखंडतेची भावना व्यक्त करते
तिरंग्यातील निळ्या रंगाचे अशोकचक्र हे 'धर्मचक्र' म्हणून देखील ओळखले जाते.