Anuradha Vipat
आतड्याचा कॅन्सर हा मोठ्या आतड्याच्या किंवा गुदाशयाच्या पेशींच्या असामान्य वाढीमुळे होतो.
सुरुवातीच्या टप्प्यात आतड्याच्या कॅन्सरची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत
आज आपण आतड्याच्या कॅन्सरची मुख्य लक्षणे कोणती आहेत हे पाहूयात.
सतत अतिसार किंवा बद्धकोष्ठता होणे हे आतड्याच्या कॅन्सरचे मुख्य लक्षण असू शकतं.
शौच करताना किंवा शौचानंतर चमकदार लाल किंवा गडद, काळपट रंगाचे रक्त दिसणे.
पोटात सतत दुखणे, मुरड येणे, गॅस होणे किंवा पोट फुगल्यासारखे वाटणे.
शौच करून आल्यानंतरही पोट पूर्णपणे साफ झाले नाही असे सतत वाटणे.