Anuradha Vipat
हिवाळ्यात थंड की गरम पाण्याने अंघोळ करावी हा प्रत्येकाच्या सोयी आणि आरोग्याच्या स्थितीवर अवलंबून असते.
बहुतेक लोक हिवाळ्यात गरम पाण्याने अंघोळ करणे पसंत करतात.थंडीच्या दिवसात गरम पाण्यामुळे शरीराला उब मिळते आणि थंडी कमी जाणवते.
रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्याने अंघोळ केल्यास शरीर शांत होते आणि झोप चांगली लागते.
गरम पाण्याने अंघोळ केल्यास त्वचेतील नैसर्गिक तेल कमी होते, ज्यामुळे त्वचा खूप कोरडी आणि निस्तेज होते.
थंड पाण्यामुळे शरीरातील रक्ताभिसरण सुधारते. थंड पाण्याने अंघोळ केल्यास आळस दूर होतो
थंड पाणी त्वचेचे नैसर्गिक तेल टिकवून ठेवते, ज्यामुळे त्वचा आणि केस निरोगी राहतात.
हिवाळ्याच्या तीव्र थंडीत थंड पाण्याने अंघोळ करणे कठीण जाते आणि यामुळे सर्दी होण्याची शक्यता असते.