sandeep Shirguppe
आयुर्वेदात आवळ्याला महत्व आहे, आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी, टॅनिन, फॉस्फरस, लोह आणि कॅल्शियम आढळते.
जर तुम्हाला तुमच्या त्वचेवर नैसर्गिक चमक आणायची असेल, तर तुम्ही तुमच्या आहारात आवळा समाविष्ट करू शकता.
आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी आढळते, जे केवळ त्वचा निरोगी ठेवत नाही तर केसांना चमकदार बनवते.
मधुमेहाचे रुग्णांनी आहारात आवळा समाविष्ट केल्यास रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवता येते.
आवळाच्या वापराने केस मजबूत तर होतातच पण केसगळती रोखण्यासाठीही ते उपयुक्त ठरू शकते.
रोज एक आवळा खाल्ल्याने डोळ्यांच्या आरोग्यावरही सकारात्मक परिणाम होतो. आवळ्याच्या वापराने डोळे तंदुरुस्त ठेवता येतात.
आवळ्यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी शुक्राणूंची संख्या कमी असलेल्या लोकांमध्ये शुक्राणूंची संख्या वाढवण्यास मदत करते.
आवळ्याचा रस हा लिव्हर संबंधित आजार असणाऱ्या रूग्णांसाठी अत्यंत हानिकारक ठरतो.
ज्या व्यक्तींना किडनीशी संबंधित आजार आहेत, त्यांच्या आवळा खाणं अथवा आवळ्याचा ज्यूस पिणं हे हानिकारक ठरू शकते.