Anuradha Vipat
सलग ७ दिवस नियमितपणे नारळ पाणी प्यायल्यास तुमच्या शरीरात अनेक सकारात्मक बदल घडून येऊ शकतात.
नारळ पाणी हे नैसर्गिक इलेक्ट्रोलाइट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजांनी समृद्ध असल्याने त्याला 'अमृतपेय' असेही म्हटले जाते.
नारळ पाणी पचनसंस्थेसाठी अत्यंत सौम्य आणि फायदेशीर असते.
यातील नैसर्गिक एन्झाइम्स पोटातील ऍसिडिटी कमी करण्यास मदत करतात, ज्यामुळे जळजळ आणि गॅसचा त्रास कमी होतो.
यामध्ये फायबर असल्याने पचनक्रिया सुरळीत होते आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर होण्यास मदत होते.
नियमित सेवनामुळे पोट जड वाटणे किंवा फुगणे यांसारख्या समस्या कमी होतात.
यातील अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी मुळे त्वचेचा पोत सुधारतो आणि चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते.