Anuradha Vipat
नारळाच्या झाडाला 'कल्पवृक्ष' म्हटले जाते कारण त्याचा प्रत्येक भाग अत्यंत उपयुक्त आहे
नारळाच्या प्रत्येक भागाचे आरोग्यासाठी तसेच दैनंदिन जीवनात अनेक फायदे आहेत.
नारळाच्या पाण्यात इलेक्ट्रोलाइट्स असतात, जे शरीराला झटपट ऊर्जा देतात आणि डिहायड्रेशन टाळतात.
खोबऱ्यामध्ये फायबर, मॅंगनीज आणि तांबे यांसारखे आवश्यक पोषक घटक असतात.
नारळाचे तेलामध्ये हेल्दी फॅटी ऍसिड असतात, जे आरोग्यासाठी चांगले मानले जातात.
नारळाच्या काथ्याचा वापर भांडी घासण्यासाठी किंवा शरीराचा स्क्रब म्हणून केला जातो.
नारळाचे खोड बांधकाम आणि फर्निचरसाठी वापरले जाते.