sandeep Shirguppe
प्रत्येकाच्या घरी नारळाचा वापर वेगवेगळ्या प्रकारे केला जातो. नाराळापासून अनेक गोड पदार्थ बनवले जातात.
नारळासोबत नारळाच्या तेलाचाही आपल्या शरिराला चांगला फायदा होतो. जखम बरी करण्यासाठी नारळाचे तेल वापरले जाते.
नवजात बाळाला नारळाच्या तेलाने मालिश करणे त्याच्या शरीरासाठी चांगले आहे. बाळासाठी ते एक चांगले मॉइश्चरायझर म्हणून काम करते.
जर तुमच्या टाचांना तडे गेले असतील तर खोबरेल तेल त्यांना बरे करण्यासाठी खूप उपयुक्त आहे.
खोबरेल तेलातील दाहक-विरोधी आणि बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म आपल्या शरिरातील अनेक जखमांना बरे करतात.
नारळ तेल एक उत्तम मेकअप रिमूव्हर म्हणून काम करते. कापसाचा वापर करुन तुम्ही तुमचा मेकअप काढू शकता.
गर्भधारणेनंतर स्ट्रेच मार्क्स काढण्यासाठी खोबरेल तेल हा सर्वोत्तम पर्याय आहे.
हिवाळ्यात खोबरेल तेल फाटलेले ओठ हायड्रेट करण्यास मदत करते. कोरडी त्वचा बरी करण्यासाठी हे उपयुक्त आहे.