Mahesh Gaikwad
नारळाच्या तेलामध्ये केसांसाठी आवश्यक असणारे सर्व पोषणतत्त्वे असतात. याच्या वापरामुळे केस निरोगी, चमकदार आणि मजबूत होतात.
केसांच्या वाढीसाठी नारळ तेल उपयुक्त ठरते. यामुळे केस तुटणे, कोंडा होणे तसेच प्रदूषणांपासून केसांचे संरक्षण होते.
नारळाच्या तेलामध्ये लॉरिक अॅसिड, व्हिटामिन -ई यासारखे गुणधर्म असतात, जे केसांसाठी आवश्यक असतात.
यातील अँटी-बँक्टेरियल गुणधर्म केसांमधील कोंड्याच्या समस्येवर प्रभावी ठरतात. यामुळे कोंड्याची समस्या दूर होते.
केसांना नियमित नारळ तेल लावल्यास केस तुटणे, गळणे या सारख्या केसांच्या समस्या दूर राहतात.
नारळाच्या तेल केसांना लावल्यामुळे केसांना नैसर्गिक आर्द्रता मिळते. यामुळे केस मऊ होतात आणि कोरडेपणा कमी होतो.
नारळाचे तेल आणि मध याचे मिश्रण केसांना लावल्यास केसांना फाटे पडण्याची समस्या कमी होते.
अंडे आणि नारळाचे तेल एकत्र करून लावल्यास केसांचा कमकुवतपणा कमी होऊन केस मजबूत होतात.