Anuradha Vipat
दिवाळीच्या फराळासाठी तोंडात टाकताच विरघळणारा मऊ आणि स्वादिष्ट बेसन लाडू बनवण्यासाठी आम्ही दिलेली ही सोपी रेसिपी एकदा नक्की वापरून पाहा.
जाडसर बेसन पीठ, साजूक तूप, पिठीसाखर , वेलची पूड , जायफळ , काजू, बदाम आणि पिस्त्याचे काप.
साजूक तूपात बेसन पीठ मध्यम-मंद आचेवर भाजूण घ्या. बेसनाला सोनेरी रंग आणि खमंग वास येईपर्यंत भाजा.
भाजलेल्या बेसनात एक चमचा दूध घाला. नंतर त्यात पिठीसाखर, वेलची पूड, जायफळ पूड आणि सुक्या मेव्याचे काप घालून चांगले मिक्स करा.
मिश्रण चांगले एकत्र झाल्यावर लाडू वळा. लाडू वळताना त्यावर एक एक मनुका किंवा सुक्या मेव्याचा काप लावा.
तयार झालेले लाडू अर्धा तास हवेत सुकू द्या आणि नंतर हवाबंद डब्यात भरून ठेवा.
अशा प्रकारे खमंग मऊसुद बेसन लाडू तयार आहेत.