Anuradha Vipat
हिंदू धर्म आणि ज्योतिषशास्त्रानुसार वाहत्या पाण्यात नारळ प्रवाहित करण्यामागे काही विशिष्ट धार्मिक आणि आध्यात्मिक कारणे आहेत.
ज्योतिषशास्त्रानुसार, ज्यांच्या पत्रिकेत राहू किंवा केतूचे दोष असतात किंवा 'कालसर्प दोष' असतो त्यांना वाहत्या पाण्यात नारळ प्रवाहित करण्याचा सल्ला दिला जातो.
जर घरात सतत आजारपण असेल किंवा प्रगतीत अडथळे येत असतील तर नारळ अंगावरून ओवाळून पाण्यात सोडल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते.
अनेक लोक संकटातून सुटका होण्यासाठी 'पाणीदार नारळ' नदीत अर्पण करतात.
वाहत्या पाण्यात नारळ अर्पण केल्याने आर्थिक अडचणी दूर होतात आणि घरात सुख-समृद्धी येते.
शनिदेवाच्या साडेसातीचा प्रभाव कमी करण्यासाठी शनिवारी किंवा मंगळवारी नारळ प्रवाहित केला जातो
मकर संक्रांतीसारख्या शुभ मुहूर्तावर नारळ प्रवाहित करणे अधिक फलदायी आहे.