Anuradha Vipat
लवंगमध्ये अँटी-बॅक्टेरिअल, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म आहेत. चला तर मग आज आपण लवंग खाण्याचा योग्य मार्ग कोणता ते पाहूयात.
लवंग भारतीय जेवणात मसाल्याच्या पदार्थांमध्ये वापरली जाते, जसे की करी, भात, आणि भाज्या.
लवंग गरम पाण्यात टाकून त्याचा काढा किंवा चहा पिऊ शकता, ज्यामुळे सर्दी, खोकला आणि घसादुखीमध्ये आराम मिळतो.
लवंग तेलाचा वापर दातदुखी आणि हिरड्यांच्या समस्यांसाठी केला जातो. तेलाने हलकेच मालिश केल्यास आराम मिळतो
सकाळी रिकाम्या पोटी 1-2 लवंगा चघळल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि तोंडातील बॅक्टेरिया कमी होतात
जास्त लवंग खाल्ल्याने ऍसिडिटी किंवा इतर पचनाच्या समस्या उद्भवू शकतात.
गरोदरपणात आणि स्तनपान करताना काही लोकांना लवंगाची ऍलर्जी होऊ शकते, त्यामुळे ते खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे चांगले.