Mahesh Gaikwad
लवंग हा एक असा मसाला आहे, जो जेवणाची चव वाढविण्यासाठी वापरला जातो. एवढेच नाही, तर लवंगाचे पाणी आरोग्यासाठी फायदेशीर असते.
लवंगाचे पाणी प्यायल्याने घसा साफ होतो. तसेच सर्दी व खोकल्यामुळे होणारा त्रास कमी होतो.
लवंगाचे पाणी चयापचयाची क्रिया सुधारते. त्यामुळे शरीरातील अतिरीक्त चरबी जळण्याची प्रक्रिया वेगवान होते, परिणामी वजन नियंत्रणात राहते.
लवंग दातदुखीवर प्रभावीपणे काम करते. लवंगाचे पाणी तोंडाची दुर्गंधी व तोंडातील इन्फेक्शनवर उपयुक्त ठरते.
लवंग रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत करते, त्यामुळे हे मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरते.
लवंगामध्ये असलेले युजेनॉल नावाचे घटक पचनसंस्थेतील सूज व अॅसिडिटी कमी करण्यास मदत करते, परिणामी अन्न पचायला मदत होते.
लवंगमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे त्वचेला निरोगी ठेवतात. यामुळे मुरुम आणि त्वचेवरील लालसरपणा कमी होतो.
दररोज सकाळी रिकाम्या पोटी कोमट लवंगाचे पाणी प्यायल्यास आरोग्याला अनेक फायदे होतात. ही माहिती सामान्य माहितीवर आधारित असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.