Swapnil Shinde
सिक्कीममध्ये मंगळवारी पहाटे 1.30 वाजता झालेल्या ढगफुटीच्या घटनेत आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाला आहे,
मध्ये 22 लष्करी जवानांसह 102 लोक अद्याप बेपत्ता आहेत.
नेपाळमधील भूकंपामुळे सिक्कीमचे लोनाक सरोवर फुटले असल्याची भीती शास्त्रज्ञांना आहे. इस्रोने प्रसिद्ध केलेल्या उपग्रह इमेजमध्ये सरोवराचे क्षेत्रफळ कमी झालेले दिसत आहे.
ढग फुटल्यावर लोनाक सरोवरात तेवढे पाणी धरणात माऊ शकले नाही. त्यामुळे तिस्ता नदीला पूर आला.
सिक्कीममधील मंगन, गंगटोक, पाक्योंग आणि नामची या चार जिल्ह्यांना पुरामुळे सर्वाधिक नुकसान झाले आहे.
डिखचू, सिंगतम आणि रंगपो ही शहरे पाण्यात बुडाली आहेत. सिक्कीमला देशाशी जोडणारा राष्ट्रीय महामार्ग NH-10 देखील पुरात वाहून गेला.
पुरामुळे चुंगथांग धरणही फुटले. हा सिक्कीमचा सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प होता.