Animal Care : हवामान बदल जनावरांसाठी ठरतेय धोकादायक

Team Agrowon

पावसाचे कमी-अधिक, अनियमित प्रमाण, तापमान, आर्द्रतेचा आरोग्यावर परिणाम.

Animal Care | Agrowon

अधिक तापमान व आर्द्रतेमुळे उष्णतेचा ताण वाढतो. त्यामुळे चयापचय प्रक्रिया मंदावते, भूक मंदावते दुग्धोत्पादन कमी होते, प्रजननक्षमता घटते, दुधाची गुणवत्ता ढासळते.

Animal Care | Agrowon

कितनबाधेसारखे चयापचयाचे आजार, आम्ल अपचन, लंगडणे यांसारख्या व्याधी जडतात.

Animal Care | Agrowon

अनियमित पाऊस, अतिवृष्टीमुळे कीटक, बाह्यपरजीवींचे प्रमाण वाढते. त्यामुळे कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढतो, जिवाणूजन्य आजाराच्या साथी येतात. प्राणिजन्य आजारांचे प्रमाणही वाढते.

Animal Care | Agrowon

पाऊस, वातावरणातील तापमान व आर्द्रता यांच्यामध्ये चढ उतार झाल्याने जनावरांना वातावरणातील बदलाच्या विविध ताणास सामोरे जावे लागते.

Animal Care | Agrowon

कमी पाऊस व अधिक तापमान राहिल्यास चाऱ्यामध्ये लिग्नीनचे प्रमाण वाढते. त्यामुळे चाऱ्याची गुणवत्ता घटते.

Animal Care | Agrowon

कमी पावसामुळे चाऱ्याचे उत्पादन कमी होते. त्यातून चारा व खाद्य टंचाई निर्माण होते. पिण्याच्या पाण्याची उपलब्धता कमी होते.

Animal Care | Agrowon