Anuradha Vipat
स्वयंपाकघरातील काळाकुट्ट झालेला तवा पुन्हा नव्यासारखा चमकवण्यासाठी काही सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय खालीलप्रमाणे आहेत.
तव्यावर बेकिंग सोडा पसरवा आणि त्यावर लिंबाचा रस पिळा. १५-२० मिनिटांनंतर घासणीने घासून काढा.
तवा थोडा गरम करा. त्यावर व्हिनेगर आणि थोडे मीठ टाकून काही वेळ राहू द्या.
खूप जास्त जळलेला तवा असेल, तर मोठ्या पातेल्यात पाणी उकळा, त्यात डिटर्जंट आणि तवा टाकून १०-१५ मिनिटे उकळू द्या.
लोखंडी तवा स्वच्छ करण्यासाठी जुन्या काळातील हा उपाय आजही गुणकारी आहे.
लोखंडी तवा जास्त काळ टिकवण्यासाठी आणि स्वच्छ ठेवण्यासाठी त्यावर कांदा घासून मग तेल लावून ठेवावे.