sandeep Shirguppe
अँटीऑक्सिडंट्स, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-बॅक्टेरियलने समृद्ध असलेल्या दालचिनीचे अनेक फायदे आहेत.
दालचिनीमध्ये अँटिऑक्सिडंट्स असतात, जे रोगप्रतिकारशक्ती वाढवतात आणि संसर्गापासून संरक्षण करतात.
रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास दालचिनी मदत करते आणि इन्सुलिनच्या कार्यक्षमतेत सुधारणा करते.
खराब कोलेस्ट्रॉल कमी आणि चांगल्या कोलेस्ट्रॉलची पातळी वाढवण्यासाठी दालचिनीचा उपयोग होतो.
दालचिनी चयापचय वाढवते आणि वजन कमी करण्यास मदत करते.
दालचिनी अपचन आणि गॅस यांसारख्या समस्या दूर करते.
सकाळी रिकाम्या पोटी दालचिनीचे पाणी प्यावे, ज्यामुळे अनेक आरोग्य फायदे मिळतात.
दालचिनीला गरम पाण्यात उकळून चहा बनवून प्यावा.