sandeep Shirguppe
शिरोळ तालुक्यातील कोरडवाहू चिपरी गावातील भाऊसो पाटील यांनी गेली २५ वर्षे आंतरपिकातून योग्य नियोजन केले आहे.
दीड एकराचे दोन भाग करून वर्षभर हंगामानुसार विविध पिकांच्या लागवडीस सुरुवात करून दरमहा हाती पैसा येत राहिल असे नियोजन केले.
गेल्या पंचवीस वर्षांपासून पाटील लावण उसात फ्लॉवरचे आंतरपीक घेतात. यादृष्टीने त्यांनी ऊस लागवडीचे नियोजन केले आहे.
फ्लॉवर पीक पूर्ण काढल्यानंतर उसाची मोठी भरणी केली जाते. ऊस भरणी करताना फ्लॉवरची पाने जमिनीत गाडली जातात. यामुळे हिरवळीचे खत म्हणून पानांचा उपयोग होतो.
पावसाळा सुरू झाल्यानंतर दर आणि वातावरण पाहून भाजीपाला लागवडीचे नियोजन केले जाते. टोमॅटो, मिरची, बिन्स, काकडी, दुधी भोपळा, दोडका आदी भाजीपाला लागवड केली जाते.
उसाची तोडणी झाल्यानंतर खोडवा ठेवला जातो. खोडव्यात चाऱ्यासाठी मका लागवड केली जाते. साधारणतः जानेवारी-फेब्रुवारीपर्यंत खोडव्याची तोडणी होते.
आई विमल आणि पत्नी स्मिता यांच्या साथीने त्यांनी शेतीचे व्यवस्थापन सांभाळले आहे. फ्लॉवर विक्रीतून तीन महिन्यांत तीस पस्तीस हजार रुपयांचे उत्पन्न मिळते.
पाटील यांनी शेतीला पशुपालनाची जोड दिली आहे. सध्या त्यांच्या गोठ्यात तीन गाई आणि एक म्हैस आहे. दररोज पंधरा लिटर दूध डेअरीला दिले जाते.