sandeep Shirguppe
हिवाळा सुरू होताच पालक आपल्या लहान मुलांच्या आहारात बरेच बदल करतात. यामध्ये पोषक असलेले दही भात बंद करतात. याबाबत जाणून घेऊ
डाएट एन क्युअरच्या आहारतज्ञ आणि पोषणतज्ञ दिव्या गांधी यांच्या मते, हिवाळ्यात मुलांना दही भात खायला दिला जाऊ शकतो.
याने मुलाच्या आरोग्याला कोणतीही हानी होत नाही. तथापि, जर मूल आजारी असेल तर त्यांनी दही भात खाणे टाळावे.
दही हा कॅल्शियम आणि प्रोटीनचा चांगला स्रोत मानला जातो. यात प्रोबायोटिक्स देखील असतात, जे हाडे मजबूत ठेवण्यास मदत करतात.
लहान मुलांना सामान्यतः खूप जड पदार्थ खायला देता येत नाहीत. याचे कारण मुलांना सर्व काही सहजासहजी पचत नाही.
दही देखील उर्जेचा एक चांगला स्त्रोत मानला जातो. यामुळे लहान मुले दिवसभर सक्रिय राहू शकतात.
जर एखाद्या मुलास दुग्धजन्य पदार्थांची ऍलर्जी असेल तर त्यांना दही भात देऊ नये. यामुळे त्यांचे आरोग्य बिघडू शकते.
आजकाल बहुतेक पालक घरी दही बनवण्याऐवजी बाजारातून आणलेले दहीच घेतात. त्या दह्याचा दर्जा खालावलेला असेल तर त्रास होऊ शकतो.
दही आणि भाताशिवाय मुलांना पोषक तत्वांनी युक्त असा आहार द्यावा. यामध्ये फळे, हंगामी भाज्या आणि इतर दुग्धजन्य पदार्थांचा समावेश आहे.
हिवाळ्यात मुलांना दही भात खायला दिला जाऊ शकतो. यामुळे मुलाच्या आरोग्याला कोणतीही हानी होत नाही.