Anuradha Vipat
वाढत्या वयातील मुलांच्या योग्य शारीरिक आणि मानसिक विकासासाठी पोषण, व्यायाम आणि पुरेशी झोप या तीन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत.
हाडांच्या मजबुतीसाठी आणि उंची वाढवण्यासाठी दूध, दही, पनीर, अंडी आणि हिरव्या पालेभाज्या द्या. सकाळी १०-१५ मिनिटे कोवळ्या उन्हात बसू द्या.
आहारात मूग, मसूर, चणे, सोयाबीन, अंडी, चिकन किंवा मासे यांचा समावेश करा.
शरीरात रक्ताची कमतरता होऊ नये म्हणून गूळ, शेंगदाणे, डाळिंब, बीट आणि पालक खायला द्या.
मेंदूच्या विकासासाठी बदाम, अक्रोड आणि अळशीच्या बिया फायदेशीर ठरतात.
९ ते १३ वर्षांच्या मुलांसाठी ९ ते ११ तास आणि १४ ते १८ वर्षांच्या मुलांसाठी ८ ते १० तास झोप आवश्यक आहे.
बेकरी प्रॉडक्ट्स, चिप्स, पिझ्झा आणि कोल्ड ड्रिंक्समुळे वजन अवाजवी वाढते आणि सुस्ती येते.