Anuradha Vipat
चिकनगुनिया तापानंतरची सांधेदुखी थांबवण्यासाठी शरीरातील सूज कमी करणे, हलका व्यायाम करणे अत्यंत प्रभावी ठरते.
चिकनगुनियाचा विषाणू निघून गेल्यावरही सांध्यांमधील कडकपणा आणि वेदना अनेक महिने टिकू शकतात.
रोज रात्री हळद आणि चिमूटभर काळी मिरी टाकून कोमट दूध प्या. हळदीमधील 'कुरकुमीन' नैसर्गिक वेदनाशामक म्हणून काम करते.
१ लीटर पाण्यात १ चमचा सुंठ पावडर आणि १ चमचा धने उकळून पाणी अर्धे करा. हे पाणी दिवसभर थोडे थोडे प्या, यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात.
लसणाच्या पाकळ्या ठेचून कोमट खोबरेल किंवा तिळाच्या तेलात गरम करा. या तेलाने सांध्यांवर हलक्या हाताने मालिश करा.
सकाळी उठल्यावर सांधे कडक होतात. त्यामुळे अंथरुणावर असतानाच बोटे, मनगट आणि पायाचे घोटे हळूहळू गोल फिरवा.
दिवसातून ३-४ ग्लास ताजे शहाळ्याचे पाणी किंवा कोमट पाणी प्या, जेणेकरून सांधे कोरडे पडणार नाहीत.