Bamboo cultivation : राज्यात बांबू टास्क फोर्स बांबूंचे क्षेत्र वाढवणार; ५ वर्षात १० लाख हेक्टर क्षेत्रावर लागवडीचे नियोजन

Aslam Abdul Shanedivan

प्रदूषणाची समस्या

सध्या जगभरात प्रदूषणाची समस्या सगळ्याच देशांना सतावत आहे. आपल्या देशातही यावर उपाय केले जात असून महाराष्ट्र राज्य सरकार यावर मोठे नियोजन करत आहे

Bamboo cultivation | Agrowon

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पर्यावरण संवर्धन आणि शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी बांबू लागवड उपयोगी असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

Bamboo cultivation | Agrowon

बांबू टास्क फोर्स

यासाठी बांबू टास्क फोर्स गठीत केली असून याची पहिली बैठक मंत्रालयात पार पडली. यावेळी बांबू लागवड केल्यास मोठा आर्थिक फायदा शेतकऱ्यांना मिळेल असे शिंदे म्हणाले.

Bamboo cultivation | Agrowon

कृषी, वन, सामाजिक वनीकरण विभाग

बांबू लागवड करण्याकरिता कृषी, वन, सामाजिक वनीकरण, पर्यावरण यासह सर्व विभागांनी सकारात्मक भावनेतून टीम म्हणून काम करावे असेही शिंदे म्हणाले

Bamboo cultivation | Agrowon

रोजगार हमी योजना

तसेच यासाठी आवश्यक निधी मनरेगाच्या माध्यमातून रोजगार हमी योजना विभागाकडून उपलब्ध करुन देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

Bamboo cultivation | Agrowon

१० लाख हेक्टर क्षेत्र

राज्यात येत्या ५ वर्षात १० लाख हेक्टर क्षेत्रावर बांबू लागवड करण्याचे उद्दिष्ट्य बांबू टास्क फोर्सच्या माध्यमातून पुर्ण करण्यात येणार आहे

Bamboo cultivation | Agrowon

बँकांकडून अडवणूक नाही

तसेच बांबू लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ घेताना बँकांकडून अडवणूक होऊ नये याकडे लक्ष देण्याच्या सूचनाही शिंदे यांनी दिल्या.

Bamboo cultivation | Agrowon

Fig Processing : अंजिरापासून तयार होणारी कँडी, जॅम तुम्ही खाल्लंय का?