Chicken Pulav Recipe : चटपटीत चिकन पुलाव, पाहा रेसिपी

Anuradha Vipat

खमंग आणि चविष्ट

चटपटीत चिकन पुलाव बनवण्यासाठी सोपी रेसिपी खालीलप्रमाणे आहे. हा पुलाव खमंग आणि चविष्ट होतो.

Chicken Pulav Recipe | Agrowon

साहित्य

चिकन ५०० ग्रॅम , तांदूळ २ कप , कांदा ,टोमॅटो, आले-लसूण पेस्ट, हिरवी मिरची, दही, तेल/तूप, हळद पावडर, लाल तिखट, धणे पावडर, जिरे, खडे मसाले, कोथिंबीर आणि पुदिना, पाणी, मीठ.

Chicken Pulav Recipe | Agrowon

कृती

तांदूळ स्वच्छ धुवून २०-३० मिनिटे भिजत ठेवा. चिकनला हळद, थोडे मीठ आणि १ चमचा दही लावून १० मिनिटे मॅरीनेट करा. 

Chicken Pulav Recipe | Agrowon

मसाला फ्राय

तेल गरम झाल्यावर जिरे आणि सर्व खडे मसाले घाला. चिरलेला कांदा आणि हिरवी मिरची घालून कांदा सोनेरी होईपर्यंत परतून घ्या. आले-लसूण पेस्ट घालून चिरलेला टोमॅटो घालून मऊ होईपर्यंत शिजवा.

Chicken Pulav Recipe | Agrowon

सुके मसाले

मॅरीनेट केलेले चिकन मध्यम आचेवर ५ ते ७ मिनिटे परतून घ्या. सर्व सुके मसाले आणि दही घालून परतून घ्या. भिजवलेले तांदूळ घालून त्यात पाणी , कोथिंबीर ,पुदिना आणि चवीनुसार मीठ घाला.

Chicken Pulav Recipe | Agrowon

पुलाव

पुलाव मध्यम आचेवर शिजवूव घ्या. गरम आणि चटपटीत चिकन पुलाव तयार आहे. रायता, सॅलड किंवा लोणच्यासोबत सर्व्ह करा.

Chicken Pulav Recipe | Agrowon

Kitchen Direction : वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघर कोणत्या दिशेला असावे?

Kitchen Direction | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...