Chest Congestion Remedies : पावसाळ्यात छातीत कफ जमा झाल्यास काय करावे? सोपे उपाय

Anuradha Vipat

छातीत कफ

पावसाळ्यात हवेतील ओलावा आणि थंड वातावरणामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी होते, ज्यामुळे छातीत कफ जमा होण्याचा त्रास वाढतो.

Chest Congestion Remedies | Agrowon

उपाय

छातीतील कफ सुटा करून श्वसनमार्ग मोकळा करण्यासाठी खालील सोपे आणि प्रभावी उपाय नक्की करा.

Chest Congestion Remedies | agrowon

मिठाच्या पाण्याच्या गुळण्या

यामुळे घशातील आणि श्वसनमार्गातील कफ पातळ होऊन बाहेर पडण्यास मदत होते आणि घशाची सूज कमी होते .

Chest Congestion Remedies | Agrowon

ओवा किंवा निलगिरी तेल

गरम वाफ थेट फुफ्फुसांपर्यंत पोहोचल्यामुळे छातीत घट्ट झालेला कफ वितळतो आणि बंद नाक व छातीची जकडन त्वरित दूर होते.

Chest Congestion Remedies | Agrowon

आले आणि मधाचे चाटण

आले कफ नष्ट करते आणि मध घशातील खवखव कमी करतो. हा खोकल्यावरील आणि कफावरील सर्वोत्तम नैसर्गिक उपाय आहे.

Chest Congestion Remedies | Agrowon

हळदीचे दूध

हळदीमधील 'अँटी-बॅक्टेरियल' गुणधर्म फुफ्फुसांमधील संसर्ग कमी करतात आणि रात्री खोकल्याची उबळ येणे थांबवतात.

Chest Congestion Remedies | Agrowon

काळी मिरी आणि तुळशीचा काढा

१ कप पाण्यात ४-५ तुळशीची पाने, छोटा आल्याचा तुकडा आणि २-३ काळी मिरी ठेचून टाका. पाणी अर्धे होईपर्यंत उकळून कोमट चहासारखे प्या.

Chest Congestion Remedies | agrowon

Monsoon Diet Tips : उन्हाळ्यानंतर पावसाळ्यात आहारात कोणते बदल करावेत?

Monsoon Diet Tips | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...