Soil Fertility : जमिनीची सुपीकता तपासा जीपीएस, जीआयएस तंत्राने

Team Agrowon

सुपिकतेची पातळी

जमीन सुपीकता अन्नद्रव्य व्यवस्थापन करण्यासाठी जीपीएस आणि जीआयएस सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विभागवार जमीन सुपीकता नकाशे बनविल्यास जमीन सुपिकतेची पातळी लक्षात घेऊन उपाययोजना करता येतील.

Soil Fertility | Agrowon

अन्नद्रव्य व्यवस्थापन

जीआयएस आणि जीपीएसचा वापर करून बनविलेले जमीन सुपीकता नकाशे अन्नद्रव्यांची कमतरता व पिकाला लागणारे अन्नद्रव्य व्यवस्थापन करण्यासाठी एक कार्यक्षम भूस्थानिक साधन आणि तंत्र आहे.

Soil Fertility | Agrowon

सखोल सुपीकता

जमीन सुपीकता नकाशांद्वारे ऊस पिकाखालील प्रत्येक ठिकाणाची सखोल सुपीकता कळते. अचूक अन्नद्रव्य व्यवस्थापन करता येते.

Soil Fertility | Agrowon

जमिनीच्या प्रकारानुसार नियोजन

सद्यपरिस्थितीमध्ये क्षारयुक्त जमिनी, चुनखडीच्या जमिनी, सेंद्रिय कर्ब कमी असणाऱ्या जमिनीमध्ये समान व्यवस्थापन केले जाते. परंतु जमीन सुपीकता नकाशांचा वापर करून कारखानास्तरावर जमिनीच्या प्रकारानुसार नियोजन करू शकतो.

Soil Fertility | Agrowon

सेंद्रिय कर्बाचे प्रमाण

नकाशांचा वापर करून कार्यक्षेत्रातील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण कळून सेंद्रिय खतांचे नियोजन करता येते.

Soil Fertility | Agrowon

माती परीक्षणावर आधारित खत व्यवस्थापन

क्षारयुक्त जमिनीखालील क्षेत्राची माहिती कळते, प्रत्येक गावामध्ये माती परीक्षणावर आधारित खत व्यवस्थापन करणे शक्य आहे.

Soil Fertility | Agrowon

रासायनिक खतांचा वापर

जीपीएस आणि जीआयएस प्रणालीचा वापर करून कारखाना स्तरावर जमीन सुपीकता नकाशे उपलब्ध असल्यास मोठ्या प्रमाणात माती परीक्षणावर आधारित रासायनिक खतांचा वापर होऊ शकतो.

Soil Fertility | Agrowon
Agrowon