Mahesh Gaikwad
बदलेल्या जीवनशैलींमुळे लोकांच्या सवयीही बदलत चालल्या आहे. चुकीच्या सवयींमुळे अनेक आजारांची समस्या उद्भवू शकते.
चुकीच्या सवयींमुळे वजन वाढण्याची समस्या सामान्य झाली आहे. याशिवाय आरोग्याच्या छोट्यामोठ्या समस्यांनी लोक ग्रस्त आहेत.
बदलेल्या जीवनशैलीमुळे अनेकांना रक्तदाब, मधुमेहाची समस्या आहे. तर अनेकांमध्ये पोटाच्या समस्याही सामान्य झाल्या आहेत.
अशा विविध प्रकारच्या आजारांना कारणीभूत असतात आपल्या चुकीच्या सवयी. कोणत्या आहेत या चुकीच्या सवयी जाणून घेवूयात.
आपल्यातील पहिली वाईट सवय म्हणजे आपली दैनंदिन दिनचर्या याचे पालन न करणे.
रात्री उशीरापर्यंत जागणे, पुरेशी झोप न घेणे यामुळेही अनेक आजारांना निमंत्रण मिळते. यासाठी आपल्या झोपेचे वेळापत्रक पाळणे गरजेचे आहे.
याशिवाय आपल्या दैनंदिन आहाराकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. आजारांपासून वाचण्यासाठी बाहेरचे जेवण आणि जंकफूड खाणे पूर्णपणे बंद केले पाहिजे.
आपली सर्वात वाईट सवय म्हणजे आळस. आळस तुम्हाला शारीरिक आणि मानसिक स्वरूपाने आजारी बनवतो.
दरोरज किमान अर्धा ते एक तास तरी शारीरिक व्यायाम किंवा योगासाने करणे आवश्यक आहे. यामुळे तुम्ही उर्जावान राहाल. ही बातमी सामान्य माहितीसाठी असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.