Rain Update : ढगाळ वातावरण निर्मितीची शक्यता?

Team Agrowon

राज्यातील बहुतांशी भागांमध्ये किमान तापमानात वाढ झाली. त्यामुळे थंडीचा कडाका काहीसा कमी झाल्याचे दिसते. तर उत्तर भारतात थंडी कायम असून किमान तापमानात काहीसे चढ उतार कायम आहेत.

Monsoon | Agrowon

राज्यातील अनेक भागात थंडीत चढ उतार सुरु आहेत. आज अनेक भागात किमान तापमानात वाढ झाली होती.

Monsoon | Agrowon

मराठवाडा वगळता उर्वरित महाराष्ट्रातील कोकण व मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील अमरावती नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली जिल्ह्यात पुढील आठवड्यात काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहू शकते.

Monsoon | Agrowon

तर तुरळक ठिकाणी एकदम हलका पाऊस पडून शकतो. पण अशी शक्यता कमी दिसते. मराठवाड्यात ढगाळ वातावरणासहीत पावसाची शक्यता दिसत नाही, असे हवामान विभागाचे माजी शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले.

Monsoon | Agrowon

उत्तर भारतात अनेक ठिकाणी थंडीचा कडाका कायम आहे. पंजाब, हरियाना, छत्तीसगड, उत्तर प्रदेश आणि उत्तर राजस्थानमध्ये बहुतांशी भागात किमान तापमान ६ अंंश सेल्सिअस ते ९ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते.

Monsoon | Agrowon

तर दिल्ली, दक्षिण राजस्थान आणि उत्तर प्रदेशातील बहुतांशी भागात किमान तापमान १० अंश सेल्सिअस ते १२ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. किमान तपमान सरासरीपेक्षा २ ते ४ अंश सेल्सिअसने जास्त होते.

Monsoon | Agrowon