Anuradha Vipat
मैत्री हा मानवी जीवनातील अत्यंत महत्त्वाचा भाग आहे, परंतु चुकीची मैत्री विनाशाला कारणीभूत ठरू शकते.
चाणक्य म्हणतात की जे लोक तुमच्या समोर गोड बोलतात पण तुमच्या पाठीमागे तुमचे काम बिघडवण्याचा प्रयत्न करतात अशा लोकांपासून दूर राहा.
चाणक्य नीतीनुसार, मैत्री नेहमी आपल्या समान विचारसरणी आणि समान स्तर असलेल्या व्यक्तीशीच करावी.
चाणक्य नीतीनुसार, आपल्यापेक्षा खूप श्रीमंत किंवा खूप गरीब व्यक्तीशी केलेली मैत्री फार काळ टिकत नाही .
जो व्यक्ती तुमच्या सुखाच्या काळात सोबत असतो पण संकटाच्या वेळी पळून जातो तो खरा मित्र नाही.
चुकीच्या माणसाशी मैत्री केल्यास, जेव्हा भविष्यात तुमचे वाद होतील, तेव्हा तो तुमचे सर्व गुपितं जगासमोर उघड करू शकतो.
चाणक्य म्हणतात की, दुष्ट स्वभाव असलेल्या व्यक्तीशी मैत्री करणे म्हणजे स्वतःच्या हाताने स्वतःचा विनाश ओढवून घेण्यासारखे आहे.